पाकिस्तान विजयासाठी ३२४ धावांची गरज ....
live score :- http://namskarpune.blogspot.in/
नमस्कार पुणे :- टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि युवराज सिंहनेही पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
युवराजने 53, तर विराटने नाबाद 81 धावा ठोकल्या. युवराज बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्यानेही अखेरच्या षटकात हात धुवून घेतले. त्याने 6 चेंडूत 20 धावा ठोकल्या. याच खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 3 बाद 320 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं आहे.
रोहित शर्माचं शतक केवळ 9 धावांनी हुकलं. तो 91 धावांवर बाद झाला. त्याआधी शिखर धवन शानदार अर्धशतक ठोकून 68 धावांवर माघारी परतला. तर युवराज आणि विराटने अभेद्य भागीदारी रचली.
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 48 षटकांचा करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता 48 षटकात ङ्कवोर्थ लुईस प्रमाणे 32४ धावा करण्याचं आव्हान आहे.
भारतीय गोलंदाजांसमोर आता पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखणं आव्हान आहे. भारतीय गोलंदाजीची मदार भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमरा, उमेश यादव आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर असेल.
पाकिस्तान ला धु धु धुतलं !!!!
Reviewed by Unknown
on
7:57 AM
Rating:
Reviewed by Unknown
on
7:57 AM
Rating:


No comments: