नमस्कार पुणे :- बालाजीनगर येथील ब्लूमिंग बडस् शाळेने आठव्या वर्षात पदार्पण केले असून यानिमित्त शनिवारी (ता.10) सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी ‘सेल्फी कॉन्टेस्ट’ आयोजित करण्यात आली आहे.
वर्धापनदिनानिमित्त शाळेच्या संचालिका शारदा दातीर यांनी शाळेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘शाळेचा वर्धापनदिन दर वर्षी 10 जून रोजी आजी-माजी विद्यार्थी आणि पालकांसह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बालाजीनगरमध्ये प्रीप्रायमरी विभागात सर्वात जास्त विद्यार्थी क्षमता असलेली ‘ब्लूमिंग बडस्’ ही शाळा आहे. सर्व विद्यार्थ्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमासह साजरा केला जातो. त्यामुळे मुलांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होते. येथे सुमारे 5 हजार स्क्वे. फूट जागेत एसएससी आणि सीबीएसई बोर्डाचे 14 वर्ग चालतात. पहिलीसाठी विद्यार्थी दुसर्या शाळेत गेल्यानंतरही ‘ब्लूमिंग बडस्’ने विद्यार्थी आणि पालकांशी असलेले ऋणानुबंध जपले आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक अॅक्टीव्हिटी आगळ्या- वेगळ्या प्रकारे घेतली जाते. त्यामुळे इतर शाळाही अशा प्रकारच्या अॅक्टीव्हिटी राबवितात, याचे आम्हाला समाधान आहे.’’

‘ब्लूमिंग बडस्’चे 8व्या वर्षात यशस्वी पदार्पण
Reviewed by Unknown
on
9:55 PM
Rating:

No comments: