नगरसेवक बाळासाहेब धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द !!!



नगरसेवक बाळासाहेब धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द !!!


नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज ः धनकवडीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर उर्फ बाळासाहेब धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

बाळासाहेब धनकवडे धनकवडी-आंबेगाव पठार, प्रभाग 39 अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षित जागेवर तब्बल सात हजार मताधिक्याने निवडून आले होते. धनकवडे यांनी नगरसेवकपदासाठी कुणबी असल्याचा दाखला दिला होता. त्यांच्या दाखल्याबाबत मृणाल ढोले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले होते. पालिकेच्या निवडणूक विभागाने धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे मंजुरीसाठी ठेवला होता. आयुक्तांनी धनकवडे यांच्यावर कारवाई करत त्यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे.

न्यायालयात दाद मागणार
जात पडताळणी प्रकरणी मी न्यायालयात दाद मागितली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत आहे. याप्रकरणी मी उच्च न्यायालयात दाद मागितली असून येत्या 10 जुलैला न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालयाने महापालिकेला बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. असे असताना आयुक्त कुणाल कुमार यांनी आकसाने आणि भाजपच्या दबावाखाली माझे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.
                                                                                                                 - बाळासाहेब धनकवडे

नगरसेवक बाळासाहेब धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द !!! नगरसेवक बाळासाहेब धनकवडे यांचे नगरसेवकपद रद्द !!! Reviewed by Unknown on 10:12 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads