आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीचा निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी




        नमस्कार पुणे :- आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीचा निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी झाला असून एकही अर्ज न दाखल झाल्याने सदरची निवडणूक रद्द ठरवण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या दक्षिण हद्दिलगत असलेल्या हवेली तालुक्यातील आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतिचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र मनपात समावेश व्हावा म्हणून ग्रामस्थांनी एकमुखाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.



पालिका हद्दीलगत असल्यामुळे आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारती उभारल्या असल्याने लोकसंख्येला पायाभूत सोयी सुविधा पुरवताना ग्रामपंचायात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मनपात समावेश करावाअशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र या मागणीला यश येत नसल्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होवून ग्रामपंचायातीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आंबेगाव खुर्दसह हवेलीतील मनपा हद्दिलगतच्या १५ गावांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने बहिष्कार टाकला असताना राज्य शासनाने गांभीर्याने घ्यावे व सदरच्या गावांचा मनपात समावेश करून न्याय द्यावाअशी मागणी होत आहे. तसेच ३२ गावांच्या समावेशाबाबत पालिकेने लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.
आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीचा निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीचा निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी Reviewed by Unknown on 5:01 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads