शिवनेरी ते रायगड पायी पालखी सोहळा


२४ में पासून शिवनेरी ते रायगड  पालखी सोहळा

       

        नमस्कार पुणे :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित या पालखी सोहळ्याचे यंदा चौथे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणे, शिवचरित्राचा प्रसार करणे, महाराजांनी केलेला पराक्रम, रयतेसाठीचे कार्य, विविध योजना; तसेच शहाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले वीर यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले जाते, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पायी पालखी सोहळ्याला २४ मे रोजी शिवनेरी गडावरून सुरुवात होणार आहे. गडावर सकाळी साडेआठ वाजता शिवजन्मस्थळी राजांच्या मूर्तीची आरती केली जाणार आहे. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात पालखीचे प्रस्थान होणार आहे. शिवाई मंदिरात देवीची पूजा आणि जागर झाल्यावर पालखी रायगडाकडे मार्गस्थ होणार आहे. जुन्नर, आर्वी, नारायणगाव, मंचर, पेठ, राजगुरूनगर, चाकण, मोशी, भोसरी, दापोडी, खडकी, लाल महाल, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, स्वारगेट, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, खडकवासला, खानापूर, पानशेत, कादवे घाट, वेल्हे, केळद, मढेघाटमार्गे कर्नवडी, बिरवाडी, महाड, पाचाड आणि रायगड असा या सोहळ्याचा मार्ग आहे.
   रयतेचा राजा ही बिरूदावली केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावापुढे लावली जाते. राजांच्या कार्याचा जागर आणि सामाजिक विषयांची जोड देण्याच्या हेतूने ‘शिवधनुष्य प्रतिष्ठान’तर्फे सुरू करण्यात आलेला शिवनेरी ते रायगड पायी पालखी सोहळा यंदा २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. २६५ किलोमीटर अंतराच्या या पालखी सोहळ्यादरम्यान वाढते तापमान, प्रदूषण या विषयी जनजागृती केली जाणार असून संपूर्ण पालखी मार्गावर ग्रामस्थांच्या सहभागाने वृक्षारोपण केले जाणार आहे.


पुण्यात पालखी मुक्काम

     पुण्यात २८ मे या दिवशी लाल महालात पालखीचे आगमन होणार असून मर्दानी खेळ आणि शस्त्र रिंगण करून राजांना मानवंदना दिली जाणार आहे. २९ मे या दिवशी पालखी मुक्कामी राहणार आहे. या दिवशी पुरस्कार वितरण, व्याख्यान आणि ५१ बालशाहिरांचे पोवाडे असे कार्यक्रम होणार असल्याचेही कालेकर यांनी सांगितले.
शिवनेरी ते रायगड पायी पालखी सोहळा शिवनेरी ते रायगड पायी पालखी सोहळा Reviewed by Unknown on 4:48 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads