लहानपणीचा राणादा बघायचाय ? चालतंय की !!


‘तुझ्यात जीव रंगला'  जाणार फ्लॅशबॅकमध्ये 


नमस्कार पुणे, ऑनलाईन न्यूज ः मराठी रसिकांच्या मनाची पकड घेणारी अंजलीबाई आणि राणादा ची सिरीयल ‘तुझ्यात जीव रंगला’ आता एक वेगळाच टर्न घेणार आहे. राणाला अभ्यासाची भिती का वाटते, हे उलगडण्यासाठी ही सिरीयल आता फ्लॅशबॅकमध्ये जाणार आहे. यात रसिकांना लहानपणीचा राणा पहायला मिळणार आहे.

सध्या अंजलीबाईंनी घरीच राणाची शाळा घ्यायला सुरवात केली आहे. खूप प्रयत्न करूनही राणा पाटी-पेन्सिल घ्यायला तयार होत नाही. याचे कारण शेधताना आता फ्लॅशबॅक पहायला मिळणार आहे. त्यातून राणा कुस्तीकडे कसा वळला, त्याचं बालपण कसं गेलं, त्याला पाटी-पेन्सिल का आवडतं नाही, पाटीने त्याचा काय घात केला, भूतकाळात नेमकं काय घडलं अशा अनेक प्रश्नांची उत्तर रसिकांना या फ्लॅशबॅकमधूप मिळणार आहेत. गुरुवारपासून हा भाग प्रसिद्ध होणार असून रुद्र रेवणकर या बालकलाकाराने हा छोटा राणा साकारला आहे. आता आपण म्हणू या, लहानपणीचा राणा... चालतंय की !!


लहानपणीचा राणादा बघायचाय ? चालतंय की !! लहानपणीचा राणादा बघायचाय ?      चालतंय की !! Reviewed by Unknown on 7:51 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads