बँक बदलली तरी अकाऊंट नंबर कायम राहणार
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : आता मोबाईल क्रमांकाप्रमाणे लवकरच तुम्हाला बँकेचं खातंही पोर्टेबल करता येणार आहे. बँक बदलली तरी नव्या बँकेत खाते क्रमांक कायम ठेवण्याची सुविधा लवकरच खातेधारकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. तांत्रिकी अत्याधुनिकीकरणातून आधार कार्डशी बँकेचं खातं जोडण्यात आलं की ही सुविधा सहजपणे उपलब्ध करून देता येईल, असे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस.मुंद्रा यांनी सांगितले.
बँकिंग क्षेत्रातील हे खूप मोठं पाऊल मानल जात आहे. एका बँकेतील खातं बंद करून दुसऱ्या बँकेत खातं उघडताना खातेधारकांना होणारा त्रास यामुळे कमी होईल. नव्या बँकेचा नवा खाते क्रमांक मिळवा, मग तो लक्षात ठेवा अशा नानाविध कटकटींना खातेधारकांना सामोरे जावं लागणार नाही. तुमच्या जुन्या बँकाचेचा खाते क्रमांक कायम ठेवून नव्या बँकेत नव्याने खातं सुरू करता येईल. याशिवाय, अनेक बँकांमध्ये एकच बँक खाते क्रमांक कायम ठेवण्याची सुविधा असणार आहे. यामुळे खाते धारकांना चांगली सुविधा देण्यासाठीची स्पर्धा बँकांमध्ये निर्माण होईल आणि प्रत्येक बँक आपल्या खातेधारकांना खूश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील.
आरबीआयचं हे पाऊल खाते धारकांसाठी सोयीचं असलं तरी ते प्रत्यक्षात लागू करणं बँकांसाठी खूप जिकरीचं ठरणार आहे. एकच बँक खाते क्रमांक कायम ठेवणं बँकांसाठी खूप मोठं आव्हान ठरणार आहे. यात काही उणीवा राहण्याचीही शक्यता आहे. तांत्रिक आणि डाटा-इंटिग्रेशन अतिशय चोख ठेवावं लागेल.
”बँकांना यासाठी त्यांची बँक खाते क्रमांक प्रणालीची पुनर्रचना करावी लागणार आहे. प्रत्येक बँकेची खाते धारकांना खाते क्रमांक देण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ती एकाच प्रणालीवर आणावी लागेल आणि यात प्रत्येक बँकेला आपले सॉफ्टवेअर पूर्णपणे बदलावे लागतील.”, असे बँक बाझारचे सीईओ आधिल शेट्टी यांनी सांगितले.
बँक बदलली तरी अकाऊंट नंबर कायम राहणार
Reviewed by Unknown
on
6:55 AM
Rating:
Reviewed by Unknown
on
6:55 AM
Rating:

No comments: