‘नमस्कार पुणे’च्या वृत्तानंतर पावसाळी चेंबरची तातडीने दुरूस्ती

बालाजीनगर मधील चेंबरची तातडीने दुरूस्ती


के. के. मार्केट रस्ता : पावसाळी चेंबरची दुरवस्था झाल्याचे वृत्त 'नमस्कार पुणे' मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने चेंबर ची दुरूस्ती केली



नमस्कार पुणे : बालाजीनगर येथील के.के. मार्केट रस्त्यावरील ‘पावसाळी चेंबरची जाळी तुटल्याने अपघाताचा धोका’ असे वृत्त ‘नमस्कार पुणे’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन तातडीने चेंबरची दुरूस्ती केली.    
के.के. माकेट रस्त्यावरील पावसाळी चेंबरच्या झाकणाची जाळी तुटल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
बिबवेवाडी-अप्पर आणि धनकवडी-बालाजीनगर परिसराला जोडणारा हा मार्ग रहदारीचा आहे. या रस्त्यावरून जड वाहनांसह नागरी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे चेंबर खचून झाकणांच्या जाळ्या तुटण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. या झाकणाची दुरुस्ती तत्काळ व्हावी, अशी नागरिकांची मागणी होती. याबाबची बातमी ‘नमस्कार पुणे’च्या अंकात 20 मे रोजी प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेत प्रशासनाने 22 मे रोजी चेंबरवरील तुटलेले झाकण काढले आणि त्या ठिकाणी नवे झाकण बसवले.

‘नमस्कार पुणे’च्या वृत्तानंतर पावसाळी चेंबरची तातडीने दुरूस्ती ‘नमस्कार पुणे’च्या वृत्तानंतर पावसाळी चेंबरची तातडीने दुरूस्ती Reviewed by Unknown on 4:02 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads