कात्रजमधील आनंद समर कॅम्पचा समारोप



महाराष्ट्र प्रवर्तक प.पू. कुंदनऋषिजी म.सा. यांचा 56वा दीक्षादिन उत्साहात

ऊर्मिला हिरवे : नमस्कार पुणे


               महाराष्ट्राच्या विविध भागातून ‘आनंद समर कॅम्प’साठी आलेली साडेचारशे मुले.. सोबतीला ना आई-बाबा ना ताई-दादा... तरीही चक्क दहा दिवस मुले येथे रमली. इतकी की समारोपाच्या दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना सोडून घरी परतताना या चिमुकल्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.. आई-बाबांचा मोबाईल नंबर शेअर करत या सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला तो पुढच्या वर्षी पुन्हा समर कॅम्पला भेटण्याचा निश्चय करूनच !!

आनंद नवकार परिवार ट्स्टच्या वतीने कात्रज येथे आयोजित आनंद समर कॅम्पचा समारोप नुकताच झाला. या वेळी महाराष्ट्र प्रवर्तक प.पू. कुंदनऋषिजी म.सा. यांचा  56 वा दीक्षादिनही साजरा करण्यात आला.

मला या समर कॅम्पमध्ये खूप काही शिकायला मिळाले. गेम्स, धार्मिक नॉलेज क्लास, आर्ट सेशन आवडले. येथे मला खूप फ्रेंडस् मिळाले. मी पुढच्या वर्षीही कॅम्पला नक्कीच येईन.                                   
- लब्धि परेश चोपडा,
शिरूर





पू.श्री. कुंदनऋषिजी म.सा., पू. श्री. आलोकऋषिजी म.सा. तसेच श्री विनीतदर्शनाजी म.सा., श्री संबोधिजी म.सा., श्री तिलकश्रीजी म.सा. आणि श्री, र्‍हींप्रीतिजी म.सा. यांच्या सान्निध्यात हा समर कॅम्प झाला. दहा दिवसात मुलांना धार्मिक ज्ञानासह योग-प्राणायाम, आर्ट, क्राफ्ट, संगीत, गणित, संभाषणकला याचेही प्रशिक्षण देण्यात आले. कात्रज आगम मंदिर, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे मुलांनी भेट दिली. मुलांसाठी हास्य कार्यक्रम, भक्तीसंगीत आणि मॅरेथॉन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्या मुलांना समारोपाच्या दिवशी बक्षिसे देण्यात आली. या वेळी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 

शबिरातील सत्र व मार्गदर्शक
करिअरची निवड - अशोक पगारीया
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट - मृदुला चोरडिया
अ‍ॅक्युप्रेशर - अनिता मुनोत
मेमरी टेक्निक - मयूर फुलफगर
ब्रेन अ‍ॅक्टीव्हिटीज - गौरव भंडारी
योग्य आहार - हेमा सेलोत
स्टेज डेअरींग - श्वेता राठोड
आर्ट व क्राफ्ट - अनुजा भंसाळी
या वेळी बोलताना ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे महामंत्री अशोक पगारीया म्हणाले, ‘‘बालकांना संस्कार आणि ज्ञान देणे हे आचार्य श्री आनंदऋषिजी म.सा. यांचे स्वप्न होते. या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नाची पूर्तता होत आहे. गेले 10 दिवस मुले येथे पालकांशिवाय शिस्तबद्ध पद्धतीने राहिली, हे या समर कॅम्पचे यश आहे.’’ 


या वेळी नगरसेवक प्रवीण चोरबेले, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, बाळासाहेब धोका, पुखराजजी हिरण, कांतीलाल बाफना, संपतलाल बोथरा, सुरेश गांधी यांच्यासह जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शर्मिला बाफना, ज्योती गांधी, छाया गांधी, स्मिता भटेवरा, सारीका पटवा आदींनी परिश्रम घेतल

कात्रजमधील आनंद समर कॅम्पचा समारोप कात्रजमधील आनंद समर कॅम्पचा समारोप Reviewed by Unknown on 11:03 PM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads