नमस्कार पुणे, प्रतिनिधी ः जागतिक मातृदिन आणि ताणतणाव दिनानिमित्त ‘श्रीराम एकत्व योगा’ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी धनकवडीतील पायगुडे निवास येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे शंभरपेक्षा अधिक ज्येष्ठांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच सामाजिक कार्यकर्ते रायबा भोसले, लोकमतच्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीचे प्रमुख हणमंत पाटील, योगगुरू रामचंद्र नांगरे, अनंत राजेशिर्के, विलास भणगे, मोहन माने, मनीषा पाटील, लता कुलकर्णी, सूर्यकांत गोले, किशोर हिंगमिरे, चंद्रकांत सस्ते, सुधाकर कोंडे, भिकाजी साळुंके, प्रदीप गायकवाड, प्रशात संकपाळ, नारायण म्हस्के आदी उपस्थित होते. उतारवयात ज्येष्ठांनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन शिबिराचे आयोजन केल्याचे संयोजक भानुदास पायगुडे यांनी यावेळी नमूद केले.
धनकवडीत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by Unknown
on
11:10 PM
Rating:

No comments: