Breaking News .. पहा कशी कोसळली नर्‍हेतील चार मजली इमारत !




नर्‍हेतील बांधकामावर पीएमआरडीएचा  बुलडोज़र 



नमस्कार पुणे, ऑनलाईन न्यूज ः ‘पीएमआरडीए’ने नर्‍हेतील अनधिकृत इमारतीवर कारवाई करत चार मजली इमारत जमीनदोस्त केली. नर्‍हे (ता. हवेली) येथील सर्वे नं. 5/1/1 येथे विशाल राजेंद्र भूमकर आणि राजेंद्र म्हस्कू भूमकर यांच्या मालकीचे अनधिकृत निवासी बांधकाम सुरू होते. हे बांधकाम थांबविण्याबाबत ‘पीएमआरडीए’कडून त्यांना नोटीस देण्यात आली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत इमारतीचे बांधकाम सुरू होते. अखेर हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई पीएमआरडीएला करावी लागली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली कारवाई अवघ्या दीड तासासंपली. दोन पोकलेनच्या साह्याने केलेल्या कारवाईत तळमजला आणि वर तीन अशी एकूण चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या कारवाईत 2200 चौ. फू. क्षेत्र मोकळे करण्यात आले.



पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तहसीलदार विकास भालेराव, उपअभियंता वसंत नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू जगताप यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, नागरिकांनीही घर घेताना ते अनधिकृत आहे अथवा नाही याची चौकशी करून आणि कागदपत्रांची पडताळणी करूनच खरेदी करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.



Breaking News .. पहा कशी कोसळली नर्‍हेतील चार मजली इमारत ! Breaking News .. पहा कशी कोसळली नर्‍हेतील चार मजली इमारत ! Reviewed by Unknown on 2:41 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads