नमस्कार पुणे :- शेतकऱ्यांचे आंदोलन पेटल्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मंजूरी जाहीर केली. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण तयार झाला होता आणि आंदोलन थांबल्याने राज्यातील भाजप सरकारला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री यांनी ‘तुमचं तुम्ही बघा’ अशा थाटात राज्यावरच सारी जबाबदारी ढकल्यानं फडणवीस सरकारची चांगलीच गोची होऊन बसली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात प्रश्न विचारला असता, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी उत्सुक असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांचा वापर करून निधी उभारावा, असं थेट उत्तर दिलं. त्यामुळे केंद्राकडून अपेक्षा करणं चुकीचं असून मदतची दारं बंद केल्यासारखं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यातील फडणवीस सरकारने दिलेला कर्जमाफीचा ‘शब्द’ कसा पाळला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
‘तुमचं तुम्ही बघा’ केंद्राने दिली टांग, कर्जमाफीवर फडणवीस सरकारची गोची
Reviewed by Unknown
on
6:01 AM
Rating:

No comments: