उद्या दहावीचा निकाल


नमस्कार पुणे, ऑनलाईन :- राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या 13 जून रोजी जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभर उशिराने लागत आहे.
सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.



उद्या दहावीचा निकाल उद्या दहावीचा निकाल Reviewed by Unknown on 5:10 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads