व्यापारी संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात

व्यापारी संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, व्यापार्‍यांना पुरस्कार व जीएसटीबाबत मार्गदर्शन


नमस्कार पुणे, प्रतिनिधी ः अखिल धनकवडी व्यापारी असोसिएशन आणि पुणे जिल्हा व्यापारी महामंडळ यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहमेळाव्याला व्यापार्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी व्यापार्‍यांसाठी जीएसटीबाबत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अ‍ॅड. व्ही. जे शहा आणि अ‍ॅड. मिलिंद भोंडे यांनी व्यापार्‍यांना मार्गदर्शन केले.
पुणे जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव महेंद्र पितळीया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, ‘‘बदलत्या काळात व्यापाराचे स्वरुप बदलले आहे. ग्राहकांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांनी काळाबरोबर चालत हे बदल आत्मसात करायला हवेत. व्यापार्‍यांनी जीएसटीची माहिती घेऊन संगणकसाक्षर होणे, ही काळाची गरज आहे.’’
या वेळी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, नगरसेवक विशाल तांबे, बाळासाहेब धनकवडे, अश्विनी भागवत, वर्षा तापकीर, गणेश भिंताडे, ‘कमानी फूडस्’चे पुणे विभागाचे प्रमुख बापू अंधारे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श व्यापार्‍यांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये पुष्कराज देशमुख, विजयशेठ मंडलेचा, हिंमतशेठ चौधरी, शिवाजी चौधरी, प्रल्हाद कुदळे, माऊली कुंभार, रुपजी चौधरी, जयनारायण मालपाणी, हिरालाल राठोड, गणेश चौधरी यांना गौरविण्यात आले.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश खोपडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘एलबीटीचा लढा, मार्केट यार्ड मधील किरकोळ व्यापार बंद करणे यामध्ये संंघटनेचे मोठे योगदान आहे. उत्तम संघटन असलेली संस्था म्हणून धनकवडी व्यापारी संघटनेचा संपूर्ण शहरात नावलौकिक आहे. आता जीएसटी लागू होत असताना व्यापार्‍यांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी संघटना तत्पर असेल.’’
शहर भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजू डांगी यांनी सर्वांचे स्वागत केले. या वेळी प्रदीप जैन, भवरलाल ओझा, माणिक जोशी, गोपाल चौधरी, राकेश उणेचा, सूरज चौधरी, सचिन गवसाने, शंकर चौधरी, लिंबाराज जाधव, नारायण चौधरी, सचिन शेवते, किसन अडगळे, प्रफुल्ल मालपाणी आदींसह मोठ्या संख्येने व्यापरी उपस्थित होते. ‘कमानी फूडस्’ यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
व्यापारी संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात व्यापारी संघटनेचा स्नेहमेळावा उत्साहात Reviewed by Unknown on 11:28 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads