हॉनर 8 प्रो 6 जीबी रॅम भारतात लाँच
हुवाई नं आपला नवा स्मार्टफोन ऑनर 8 प्रो लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जुलैपासून भारतात हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. याची खासियत म्हणजे 6 जीबी रॅम आणि बॅटरी 4000 mAh आहे.
ड्यूल सिम असणाऱ्या ऑनर 8 प्रो स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. यामध्ये 5.7 इंच स्क्रिन असून याचं रेझ्युलेशन 1440×2560 पिक्सल आहे. तर यामध्ये किरिन 960 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम आहे. तसेच यामध्ये 128 जीबी इंटरनल मेमरी असून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
यामध्ये 4G, LTE, वाय-फाय, यूएसबी पोर्ट टाइप-सी, ब्ल्यूटूथ यासारखेही ऑप्शन देण्यात आले आहेत.
- अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम
- 5.7 इंच आकाराची स्क्रीन
- किरिन 960 प्रोसेसर
- 6 GB रॅम, 128 GB इंटर्नल स्टोरेज
- 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
Honor 8 Pro 6GB RAM Launched
Reviewed by Unknown
on
8:47 AM
Rating:

No comments: