‘कट्टा’च्या टीमला सिंधुताईंच्या शुभेच्छा
‘सेलिब्रेशन ऑफ लाइफ’च्या लघुपटाचे कौतुक; यु-ट्युबवरही लाईक्स
नमस्कार पुणे, ऑनलाईन ः ‘सेलिब्रेशन ऑफ लाइफ’ या कला क्षेत्रात काम करणार्या संस्थेने ‘कट्टा : नारी मन की संवेदना’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. ही कलाकृती घेऊन या टीमने नुकतीच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची भेट घेतली. सपकाळ यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
‘कट्टा : नारी मन की संवेदना’ या लघुपटाची संकल्पना ‘सेलिब्रेशन ऑफ लाइफ’चे संस्थापक योगेश ठीक यांची आहे. फॅशन, चित्रपट, नाट्य, नृत्य अशा विविध क्षेत्रात काम करणार्या सुमारे 28 नवोदित कलाकारांना सोबत घेऊन त्यांनी ही कलाकृती नुकतीच यु ट्युबवर सादर केली आहे. स्त्री जन्माचे स्वागत आणि वेळोवेळी स्त्रीचा सन्मान व्हावा, हा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत हजारो लोकांनी हा लघुपट पाहिला आहे. लघुपटाचे चित्रीकरण पुण्यातील एकाच लोकेशनवर झाले आहे. सुमारे 15 मिनिटांच्या या लघुपटास संवादाचे बंधन नसल्याने तो सहजतेने अनेक लोकांपर्यंत पोचला आहे. समाजाच्या विविध स्तरांतून या लघुपटाचे कौतुक होत आहे.
कला क्षेत्रात पदार्पण करणार्या तरूण-तरूणींची वाट सोपी व्हावी, त्यांना मुक्त वातावरणात काम करण्याची संधी मिळावी, यासाठी योगेश ठीक यांनी ‘सेलिब्रेशन ऑफ लाइफ’ या संस्थेची निर्मिती केली. विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित छायाचित्रांची मालिका सादर करून योगेश ठीक यांनी अल्पावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.
' KATTA' Team la sindhutainchya shubheccha.........
Reviewed by Unknown
on
5:19 AM
Rating:
No comments: