रिलायन्सकडून आता फोनही फ्री मिळणार !!
जिओ फोन 15 ऑगस्टला येणार; डेटा प्लॅनही स्वस्त
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : रिलायन्सने जिओने पुन्हा धमाका करत 4G VOLTE फीचर फोन फुकटात देण्याचे जाहीर केले आहे. मुंबई येथे झालेल्या रिलायन्सच्या बैठकीत मुकेश अंबानी यांनी याबाबत घोषणा केली असून हा फोन 15 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. या फोनसाठी सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 1500 रुपये ठेवावे लागणार आहेत. मात्र हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळणार आहेत.
आणखी स्वस्त प्लॅन
याशिवाय जिओने 153 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओ फोनवर अवघ्या 153 रुपयात महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. जिओचा हा फोन टीव्हीला जोडता येणार आहे.
अशी असतील फीचर्स
या 4G VOLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल. 512MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज, ड्युअल सिम स्लॉट, 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा, 2000 MAH क्षमतेची बॅटरी, ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट असे फीचर्स या फोनमध्ये असतील.
प्री बुकिंग
यासाठी 24 ऑगस्टपासून प्री बुकिंग करता येईल. त्यामुळे जो अगोदर बूक करणार त्यालाच हा फोन अगोदर हातात पडणार आहे. सप्टेंबरपासून हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल.
रिलायन्सचा जिओ फोन फ्री मिळणार !!
Reviewed by Unknown
on
2:07 AM
Rating:

No comments: