शेतकर्यांना कर्जमाफी मिळणार पण....
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज ः जिल्ह्यात 3 लाख 39 हजार शेतकर्यांना 2 हजार 30 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. परंतु त्यासाठी संबंधित शेतकर्यांकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. त्याची सुरवात जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
पात्र शेतकर्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी हे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत बँक खाते, आधार क्रमांक आणि बायोमेट्रीक पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. पुढील महिन्याभरात हे काम संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सर्व महा-ई-सेवा केंद्रांवर हे फॉर्म भरता येणार आहेत. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टीव्हिटीची समस्या आहे, त्यामुळे हे काम महिनाभरात पूर्ण होणार की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकर्यांना टोकन देऊन फॉर्म भरण्यासाठी तारीख आणि वेळ देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. फॉर्म भरण्यासाठी कोठेही शेतकर्यांकडून शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकर्यांना कर्जमाफी मिळणार पण....
Reviewed by Unknown
on
8:12 AM
Rating:
Reviewed by Unknown
on
8:12 AM
Rating:

No comments: