मुलांचे भावविश्व समृद्ध करणारी शाळा : ब्लूमिंग बडस्




नमस्कार पुणे :-
              बालाजीनगर येथील ब्लूमिंग बडस् नर्सरी स्कूल विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. शारदा दातीर आणि विनोद दातीर यांनी सात वर्षांपूर्वी या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षणक्षेत्रात सृजनशील उपक्रम राबविणार्‍या मोजक्या शाळांमध्ये ब्लूमिंग बडस् शाळेचा समावेश होतो. प्ले ग्रुप ते सिनीयर केजीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणाबरोबरच शाळेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

सणांचे साजरीकरण तेसच गॅदरिंग, महिला दिन, फॅन्सी ड्रेस, अथर्वशीर्ष पठण, आय कॅन कुक अशा अनेक अ‍ॅक्टीव्हिटीज घेतल्या जातात. मुलांना वृक्षसंपदेचे महत्त्व समजावे, यासाठी वटपौर्णिमेला तळजाई टेकडीवर वृक्षारोपण, सायन्स डे ला कुंड्यांमध्ये बिया लावून रोपे येईपर्यंत त्यांचे निरीक्षण असे सृजनशील उपक्रम घेतले जातात. विशेष म्हणजे या उपक्रमांमध्ये पालकांनाही सहभागी करून घेतले जाते.
एसएससी आणि सीबीएसई दोन्ही प्रकारचा अभ्यासक्रम निवडण्याचा पर्याय येथे आहे. सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. आपले मूल शाळेत कशा प्रकारे शिकते, हे प्रत्यक्ष पाहण्याची संधीही पालकांना दिली जाते.
या परिसरात सर्वाधिक प्रवेश क्षमता असलेली ही शाळा असून लहान मुलांच्या अनुषंगाने शाळेत पुरेशी स्वच्छता राखली जाते, अशी माहिती शाळेच्या संचालिका शारदा दातीर यांनी दिली.


मुलांचे भावविश्व समृद्ध करणारी शाळा : ब्लूमिंग बडस् मुलांचे भावविश्व समृद्ध करणारी शाळा : ब्लूमिंग बडस् Reviewed by Unknown on 11:21 PM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads