दहा रुपयांचं नाणं चालतंय की!
नमस्कार पुणे, प्रतिनिधी ः दहा रुपयांचे नाणे चलनातून रद्द झाल्याची अफवा पसरल्याने हे नाणे स्वीकारण्यास शहरातील अनेक विक्रेते नकार देत आहेत. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा गेल्या आठ-दहा दिवसांपासून वेगाने पसरली आहे. त्यामुळे कोणीही हे नाणे स्वीकारत नाही. बाजारात किरकोळ भाजी विक्रेते, फेरीवाले यांच्यापासून तर दुकानदार, हॉटेलचालकांपर्यंत कोणीही दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आपल्याकडील नाण्यांचे करायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हे नाणे रद्द झाले नसल्याचे समजावून सांगितले तरी समोरची व्यक्ती हे नाणे घेत नसल्यामुळे आम्हाला तुमच्याकडून घेता येत नसल्याची सारवासारव विक्रेत्यांकडून केली जात आहे.
टाकसाळीत दहा रुपयांचे नाणे तयार करण्याचा खर्च अधिक येत असल्याने नवीन नाणे तयार करणे रिझर्व बँकेने बंद केले आहे. परंतु ते रद्द केले नसून चलनात कायम आहे. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे कोणालाही नाकारता येणार नाही. नाणे स्वीकारण्यास नकार हा रिझर्व बँकेच्या नियमानुसार फौजदारी गुन्हा आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास संबंधित व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे नाकारू नये.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, अर्बन बँक फेडरेशन
दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर अधिकाधिक पैसा हा प्लॅस्टीक मनीच्या स्वरुपात आणण्याचा रिझर्व बँकेचा प्रयत्न आहे. दहा रुपयांचे नाणे तयार करण्यासाठी तुलनेने अधिक खर्च येत असल्यामुळे टाकसाळीत त्याची नवीन निर्मिती बंद केली आहे. सध्या चलनातील दहा रुपयांचे नाणे हळूहळू बँकांच्या माध्यमातून रिझर्व बँकेकडे जमा होणार आहे. त्यानंतरच ते चलनातून आपोआप निघणार आहे. मात्र, काही बँकाही हे नाणे स्वीकारत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली.
खबरदार !!! १० रु चे नाणे नाकारले तर होऊ शकतो फौजदारी गुन्हा
Reviewed by Unknown
on
1:16 AM
Rating:

No comments: