प्रभाग समिती अध्यक्षपदी कोण?


अश्विनी भागवत व स्मिता कोंढरे यांच्या नावाची चर्चा





                    नमस्कार पुणे, प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असलेल्या धनकवडी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविका अश्विनी भागवत किंवा स्मिता कोंढरे यांच्यापैकी एकीच्या गळ्यात प्रभाग अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियोजित वेळापत्रकानुसार प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका शनिवारी (ता. 20) होणार होत्या. परंतु उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे आकस्मात निधन झाल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. लवकरच या निवडणुकीची तारीख जाहीर होईल. धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाला धनकवडी आणि कात्रज या अनुक्रमे 39 आणि 40 या प्रभागांसह नव्याने सहकारनगर हा प्रभाग क्रमांक 35 नव्याने जोडला आहे. तर यापूर्वी धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाला जोडलेला बालाजीनगर प्रभाग यावेळी कोंढवा क्षेत्रिय कार्यालयाला जोडला आहे. त्यामुळे धनकवडी प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादीचे सात सदस्य असल्यामुळे पूर्ण बहुमत आहे. भाजपाचे तीन तर मनसे आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. विशाल तांबे आणि अश्विनी कदम यांनी यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्षपद सांभाळले आहे. तर बाळाभाऊ धनकवडे आणि युवराज बेलदरे हे सध्या क्रीडा समितीवर तर अमृता बाबर या नाव समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे पहिल्याच वर्षी अश्विनी भागवत किंवा स्मिता कोंढरे यांच्यापैकी एकीच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचे निश्चित आहे. दरम्यान, नव्याने निवडून आलेल्या कोंढरे, भागवत, धनकवडे, बेलदरे आणि बाबर या पाचही जणांना प्रत्येकी एका वर्षासाठी अध्यक्षपदाची संधी देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निश्चित झाले आहे.
प्रभागातील पंचवीस लाख रुपयांपर्यंतची विकासकामे ही प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे या समितीला महत्त्वाचे स्थान आहे.










प्रभाग समिती अध्यक्षपदी कोण? प्रभाग समिती अध्यक्षपदी कोण? Reviewed by Unknown on 1:56 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads