नमस्कार पुणे, प्रतिनिधी : बेळगाव मोटो स्पोर्टस् व गोवा मोटो स्पोर्टस् असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या कर्नाटक निमंत्रितांच्या सुपरक्रॉस 2017 सुपर डर्ट बाइक रेसमध्ये धनकवडीतील सार्थक चव्हाण याने 7 ते 12 वर्षे वयोगटात विजेतेपद पटकावले. या यशाबद्दल आमदार भीमराव तापकीर यांच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
या वेळी नगरसेविका वर्षा तापकीर, दिगंबर डवरी, गणेश भिंताडे, विश्वास आहेर पाटील, उदय जगताप, अप्पा धावणे, अभिषेक तापकीर, गौरव शिळीमकर आदी उपस्थित होते. सार्थकला भविष्यात विविध स्पर्धांमध्ये सहभागासाठी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून काही शासकीय मदत देता येते का, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार तापकीर यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन सावली प्रबोधिनीच्या वतीने सचिन बदक यांनी केले.
सुपरक्रॉस रेस विजेता सार्थकचा सत्कार
Reviewed by Unknown
on
7:09 PM
Rating:

No comments: