घरबसल्या कराहरवलेल्या कागदपत्रांची तक्रार

मोबाईल, आधारकार्ड, वाहन परवाना, मतदार ओळख कार्ड, रेशन कार्ड अथवा महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे हरवल्यास ती नव्याने काढण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केल्याची नोंद सादर करावी लागते. त्यासाठी नागरिकांना पोलिस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतात. तेथे वेळीच तक्रारीची नोंद करून घेतली जाईल याचीही खात्री नसते. यामुळे नागरिकांना होणारा मनस्ताप आता वाचणार आहे. कारण पुणे पोलिसांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवून घेण्यासाठी ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’ ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नाही तर तक्रारीची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रिंट नागरिकांना ऑनलाईन पद्धतीनेच उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाची तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना आता पोलिस ठाण्याच्या पायर्‍या झिजवाव्या लागणार नाहीत. 


कशी कराल तक्रार?
प्रथम पुणे पोलिसांच्या www.punepolice.co.in या संकेतस्थळावर जा. तेथे Lost / found article Report System नावाचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करून स्वतःकडील मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ‘ओटीपी’ येईल. तो टाकल्यानंतर एक पेज ओपन होईल. त्यावर आपले नाव, पत्ता, ई-मेल आयडी टाकून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रिंट दिसेल. ती मोबाईलवर किंवा आपण नोंद केलेल्या ई-मेल आयडीवरही पाठवली जाईल. त्याची प्रिंट आपणास काढता येईल. संबंधित कागदपत्र अथवा मोबाईल नव्याने काढण्यासाठी ही प्रिंट सादर करता येईल.

सत्यता कशी पडताळता येईल?
हरवलेले कागदपत्र नव्याने काढण्यासाठी सादर केलेली डिजिटल स्वाक्षरी असलेल्या प्रिंटवर एक क्रमांक असेल. तो पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर टाकून या तक्रारीची सत्यता पडताळता येईल. 

तक्रारीचीप्रिंट न आल्यास..
तक्रार नोंदविल्यानंतरही ई-मेलवर प्रिंट न आल्यास एकतर ई-मेल आयडी चुकीचा टाकल्यामुळे असे घडले असेल किंवा मेल बॉक्स पूर्ण भरल्यामुळे प्रिंट मिळाली नसेल. अशा वेळी पुणे पोलिसांच्या (020) 26121299 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

यावर कोणती तक्रार नोंदवू नये?
हल्ला, मारहाण, फसवणूक, जबरी चोरी, अपघात झाल्याची किंवा व्यक्ती हरवली आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी या पोर्टलवर नोंदवू नयेत. अशा तक्रारींसाठी तातडीने पोलिसांच्या 100 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करावा.

या तक्रारीची चौकशी होईल काय?
नाही. ऑनलाईन पद्धतीने नोंदलेल्या तक्रारीची चौकशी होणार नाही. केवळ संबंधित कागदपत्र नव्याने काढण्यासाठी सादर करावी लागणार्‍या पोलिस तक्रारीची प्रत म्हणून याचा वापर करता येईल.

कोणी तक्रार करावी?
पुणे शहराच्या हद्दीत हरवलेल्या कागदपत्रांची तक्रार यावर करता येणार आहे. शहराच्या हद्दीबाहेर हरवलेल्या कागदपत्रांची तक्रार करता येणार नाही.
घरबसल्या कराहरवलेल्या कागदपत्रांची तक्रार घरबसल्या कराहरवलेल्या कागदपत्रांची तक्रार Reviewed by Unknown on 6:40 PM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads