दोन जागी भाजप तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस
नमस्कार पुणे, प्रतिनिधी : बिबवेवाडी आणि कोंढवा-येवलेवाडी या दक्षिण पुण्यातील दोन प्रभाग समित्यांवर भाजपचा झेंडा फडकला आहे, तर धनकवडी प्रभाग समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे पुढे ढकललेल्या प्रभाग समित्यांची निवड सोमवारी (ता. 12) होणार आहे. त्यासाठी बुधवारी (ता. 7) अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी बिबवेवाडी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या मानसी देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली. या प्रभाग समितीच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 28, 36 आणि 37 चा समावेश होतो. सहकारनगर, धनकवडी आणि कात्रज या अनुक्रमे 35, 39 आणि 40 या तीन प्रभागांचा समावेश असलेल्या धनकवडी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी भागवत यांची निवड निश्चित मानली जाते. या प्रभागात राष्ट्रवादीचे सात सदस्य असल्यामुळे सोमवारी अध्यक्षपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता पूर्ण होणार आहे.
बालाजीनगर या प्रभाग क्रमांक 38 आणि प्रभाग क्रमांक 41 चा समावेश असलेल्या कोंढवा-येवलेवाडी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या रंजना टिळेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या प्रभागातही भाजपचे बहुमत असल्यामुळे टिळेकर यांची अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे.
प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी देशपांडे, टिळेकर आणि भागवत
Reviewed by Unknown
on
10:25 PM
Rating:
Reviewed by Unknown
on
10:25 PM
Rating:


No comments: