नमस्कार पुणे, ऑनलाईन : बालाजीनगर येथे ‘स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिसीन स्टोअर’चे उद्घाटन महापौर मुक्ता टिळक यांचा हस्ते झाले.
या वेळी बोलताना महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘जेनेरिक औषधांमुळे औषधांवरील खर्चात बचत होणार असून त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.’’ रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आदी गंभीर आजारांवरील जेनेरिक औषधे येथे मिळणार आहेत. फर्मचे संचालक संजय कडू आणि हेमंत बमनकर यांनी स्वागत केले. तर प्रशांत शेलार, शैलेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटन प्रसंगी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक प्रकाश कदम, नगरसेविका राणी भोसले, मनीषा कदम, कालीन्दा पुंडे, डॉ. नितीन पवार, डॉ. सोनिया पवार, डॉ. प्रकाश कोठावळे, डॉ. राजीव दोषी, डॉ. शिल्पा एक्के, डॉ. अतुल चंगेडिया, डॉ. शीतल चंगेडिया, डॉ. सुनील धुमाळ, डॉ. प्राजक्ता होनप आदी उपस्थित होते.
दरम्यान, या परिसरातील जेनेरिक औषधांचे हे एकमेव स्टोअर असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक संजय कडू यांनी केले आहे.
जेनेरिक मेडिसीन स्टोअरचे बालाजीनगरमध्ये उद्घाटन
Reviewed by Unknown
on
10:12 PM
Rating:

No comments: