चाकू ऊर्फ संतोष चखाले (वय 22, रा. अंबिकानगर, अप्पर डेपो, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सन्या ऊर्फ सनी सोनवणे याचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी इझहार अन्सारी (वय 25, रा. बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांनी माहिती दिली. फिर्यादी अन्सारी याची अप्पर डेपोजवळ ‘नेता पान शॉप’ नावाने पान टपरी आहे. गुुरुवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास आरोपी चाकू आणि त्याचा साथीदार सन्या हे दोघे अन्सारी याच्या पानटपरीवर आले. त्यांनी अन्सारीकडे दमहा पाचशे रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची आणि पानटपरी बंद करण्याची धमकी दिली. चाकू ऊर्फ संतोष चखाले याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या चाकूला अटक .....
Reviewed by Unknown
on
10:09 PM
Rating:
Reviewed by Unknown
on
10:09 PM
Rating:



No comments: