गणेश मंडळांनो... आता मिळवा घरबसल्या परवाना


गणेश मंडळांनो, घरबसल्या मिळवा परवाना ... 

 परवान्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 



नमस्कार पुणे, ऑनलाईन न्यूज : सार्वजनिक गणेश मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘व्हर्च्युअल सिंगल विंडो’ सुरू केली आहे. पुणे पोलिसांच्या www.punepolice.co.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन परवानगीचा टॅब देण्यात आला आहे. त्यामुळे परवानगीसाठी विविध कार्यालयात हेलपाटे मारण्यातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची सुटका होणार आहे.

यंदा 25 ऑगस्ट ते 5 नोव्हेंबर यादरम्यान गणेशोत्सव आहे. पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 891 नोंदणीकृत तर 1688 बिगर नोंदणीकृत असे एकूण 4 हजार 579 गणेश मंडळे आहेत. त्यांना दरवर्षी स्थानिक पोलिस, महापालिका क्षेत्रिय कार्यालय, वाहतूक विभाग या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचा वेळ तर जातोच शिवाय अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्यात प्रथमच यंदा ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय ऑफलाईन पद्धतीनेही परवानगी घेता येणार आहे. परंतु दोन्हीपैकी एकाच पद्धतीने गणेश मंडळांना अर्ज सादर करता येईल. त्यासाठी सर्व वाहतूक विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व क्षेत्रिय कार्यालये आणि सर्व पोलिस ठाणे ऑनलाईन पद्धतीने एकत्र जोडण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व कार्यालयांकडे ऑनलाईन पद्धतीनेच वर्ग करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक टप्प्यावर अर्जाची प्रगती अर्जदारास एसएमएसने मिळणार आहे. अंतिम परवानगीही ऑनलाईन पद्धतीने ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहे.
दरम्यान, रनिंग मंडप आणि कमानीसाठी परवानगी घेताना महापालिकेत रकमेचा भरणा करावा लागत असल्याने त्याची परवानगी ऑनलाईन पद्धतीने मिळणार नाही. त्यासाठी महापालिकेतच अर्ज करावा लागणार आहे.
-----
ऑनलाईन परवानगी लागणारी कागदपत्रे
1. मंडळाची संपूर्ण माहिती (नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक)
2. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव/सरचिटणीस, खजिनदार यांची माहिती (नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांक, फोटो)
3. मंडप माहिती (ठिकाण, आकार)
4. सर्व ठेकेदारांची माहिती (मंडप, विद्युत, ध्वनीक्षेपक, वाहन)
5. स्थापना मिरवणूक माहिती (मार्ग, दिनांक, वेळ, वाहन, वाद्यपथके, जनसमुदाय)
6. विसर्जन मिरवणूक माहिती (मार्ग, दिनांक, वेळ, वाहन, वाद्यपथके, जनसमुदाय)
7. मागील वर्षीचा परवाना किंवा प्रमाणपत्र.

गणेश मंडळांनो... आता मिळवा घरबसल्या परवाना गणेश मंडळांनो... आता मिळवा घरबसल्या परवाना Reviewed by Unknown on 10:13 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads