ब्रह्मकमळ खुलवणार तुमचे सौंदर्य 
मिशेल एज लेस’ उत्पादने पुण्यात सादर 

                                                                                      Photos by Yogesh Theek


नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : आपल्यापैकी अनेकांना ब्रह्मकमळ माहिती आहे . मात्र, रात्री फुलणारे हे सुंदर फूल सौंदर्य टिकवण्यासाठी उपयुक्त आहे, हे आपल्याला माहित नसेल.. मिशेल फेअर अ‍ॅण्ड व्हाईट प्रा. लि. या कंपनीने याबाबत संशोधन करून ब्रह्मकमळाच्या बियांमधील अर्क वापरून विविध अ‍ॅण्टी एजिंग प्रॉडक्टस् मार्केटमध्ये आणली आहेत. नुकतीच ही प्रॉडक्टस् पुण्यात लाँच करण्यात आली.
या प्रॉडक्टस्बाबत बोलताना ‘मिशेल फेअर अ‍ॅण्ड व्हाईट’च्या संचालिका सुनीता रामनाथकर म्हणाल्या, ‘‘ब्रह्मकमळाच्या बियांमधील तारुण्य टिकविणार्‍या घटकांचा वापर करून ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. पपाया ब्राईटनिंग क्लीन्जर, लिफ्ट अ‍ॅण्ड फर्म, नेक थेरेपी, स्कीन पॉलिश, स्कीन एनर्जाइजर, लाइनलेस आय कॉम्प्लेक्स आणि नाईट थेरेपी ही सात उत्पादने आम्ही सादर करीत आहोत. भारतीय लोकांची त्वचा वेगळ्या प्रकारची आहे. तसेच येथील हवामान, प्रदूषण, आर्द्रता, जनुकीय रचना  या बाबींचाही अभ्यास करून ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. भविष्यात आणखी काही उत्पादने आणली जातील.’’

गळ्याच्या सौंदर्याकडेही लक्ष द्या
चेहर्‍याचे सौंदर्य लक्षात घेताना गळा हा अत्यंत दुर्लक्षित भाग असून खरं तर याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. कारण गळा हा अधिक हालचाल होणारा अवयव आहे. गळ्याचा भाग व्यवस्थित टोन्ड असेल तर चेहर्‍याचे स्नायूही सुस्थितीत राहतील. त्यामुळे आम्ही गळ्यासाठी विशेष ‘नेक थेरेपी’ क्रीम सादर केली आहे. 
सुनीता रामनाथकर
संचालिका
मिशेल फेअर अ‍ॅण्ड व्हाईट
मिशेल अ‍ॅण्ड व्हाईटच्या वतीने ही उत्पादने कोलकतासह इतर काही शहरात लॉन्च करण्यात आली असून त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. खास भारतीयांसाठी बनविलेली ही अशा प्रकारची एकमेव उत्पादने आहेत. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत अत्यंत कमी दरात ती ग्राहकांसाठी प्रमुख ठिकाणी उपलब्ध आहेत.
- पराग देसाई
सरव्यवस्थापक (विक्री आणि विपणन)
मिशेल फेअर अ‍ॅण्ड व्हाईट
Reviewed by Unknown on 1:06 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads