मित्रमंडळ चौकातील ‘त्या’ भूखंडावरील कुंपण पंधरा दिवसात काढा !!!
नमस्कार पुणे, ऑनलाईन न्यूज : मित्रमंडळ चौकातील तब्बल 9 एकर असलेल्या भूखंडावर बांधकाम व्यावसायिक असलेल्या भाजपाच्या एका पदाधिकार्याने घातलेले कुंपण पंधरा दिवसात काढण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच संबंधित जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही तेथे बांधकाम मंजुरीसाठी प्लॅन सादर करणे यावरून संबंधितांचा ‘हेतू’ लक्षात येत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
पर्वती पायथा येथील मित्र मंडळ चौकात महापालिकेच्या मालकीचा नऊ एकराचा भूखंड आहे. कमाल नागरी जमीन धारणा कायद्याअंतर्गत (युएलसी) 45 वर्षांपूर्वी हा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आला आहे. परंतु या भूखंडावर एका बांधकाम विकसकाने दावा केला होता. त्यावर न्यायालयीन लढाई जिंकून महापालिकेने ही जागा मिळविली आहे. या जागेवर महापालिकेच्या विकास आराखड्यात वैद्यकिय महाविद्यालय आणि परिचारिका महाविद्यालयाचे आरक्षण आहे. त्यानुसार या जागेवर महापालिकेचीच मालकी होती. परंतु भाजपाच्या एका पदाधिकार्याने येथील महापालिकेच्या नावाचा फलक हटवून या जागेवर कुंपणही घातले. तसेच महापालिकेत बांधकाम विभागाकडे प्लॅनही सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप आणि माजी उपमहापौर आबा बागूल यांनी याविरोधात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार आवाज उठविला होता. त्यानंतर खडबडून ‘जागे’ झालेल्या प्रशासनाने न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने निकाल दिला असून संबंधित भूखंडावरील कुंपण पंधरा दिवसात काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
भाजपाच्या पदाधिकार्याला न्यायालयाचा दणका!
Reviewed by Unknown
on
8:20 AM
Rating:

No comments: