दोन दिवसात आधार नोंदणी सुरळीत - जिल्हाधिकारी


दोन दिवसात आधार नोंदणी सुरळीत - जिल्हाधिकारी

नवीन 200 आधार केंद्र सुरु करणार 



नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज ः गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेली आधार नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात शहर व जिल्ह्यात 200 आधार केंद्र सुरू करण्यात येणार असून 93 आधार केंद्र सुरु झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
सध्या शाळा आणि महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. शासनाने आधार क्रमांकाची सक्ती केली असल्यामुळे आधार काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालकांची गर्दी होत आहे. मात्र आधार केंद्र बंद असल्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे आयकर रिटर्न भरण्यासाठी आधार क्रमांकाची सक्ती करण्यात आली आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै असल्यामुळे तसेच पॅन कार्ड आणि आधारची माहिती स्पेलिंग मिस्टेक, पत्ता बदलामुळे जुळत नसल्याने व्यापारी, लहान मोठे व्यावसायिक तसेच निवृत्तीवेतन धारक याना देखील आधारची माहिती अद्ययावत करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या बाबत जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘‘आधार नोंदणीसाठी केंद्र चालक नागरिकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे शासनाने आधार नोंदणीचे काम सरकारी कार्यालयातून करण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात ते शक्य नसल्याने सरकारने महा-ई-सेवा केंद्रांना आधार नोंदणी करण्याचे अधिकार दिले केले. त्यामुळे सध्या शहर आणि जिल्ह्यात एकूण 93 केंद्र सुरु करण्यात आली आहेत. येत्या दोन दिवसात 200 केंद्रे सुरु करण्यात येतील. नागरीकांनी र्ीळवरळ.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरून आपल्या परिसरातील आधार नोंदणी केंद्रात जाऊन नोंदणी करावी.’’
दोन दिवसात आधार नोंदणी सुरळीत - जिल्हाधिकारी दोन दिवसात आधार नोंदणी सुरळीत - जिल्हाधिकारी Reviewed by Unknown on 8:50 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads