"उसेन बोल्ट " नावाचं वादळ थांबणार !!!

या आठवड्यात लंडनमध्ये होणाऱ्या शर्यतीत 30 वर्षीय बोल्ट आपल्या कारकीर्दीतील अखेरची शर्यत खेळणार 

 
नमस्कार पुणे : ‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ अशी कीर्ती असलेला धावपटू उसेन बोल्ट त्याच्या कारकीर्दीतील शेवटची शर्यतधावणार आहे. लंडनमध्ये ४ ते १३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावून शेवट गोड करण्याचा बोल्टचा मानस आहे.बीजिं ऑलिम्पिक 2008 मध्ये दोन वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकून 'बोल्ट' नावाचं आलेलं वादळं आजतागायत रेसिंग ट्रॅक वर तितकंच  प्रभावी आहे.  सहा ऑलिम्पिक गोल्ड आणि 11 विश्वविजेतेपदं आतापर्यंत बोल्टच्या नावावर जमा आहेत . 9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 100 मीटर, 200 मीटर आणि 4 X 100 मीटर रिले अशा प्रत्येक प्रकारात 2011, 2013 आणि 2015 अशी सलग तीन वर्ष त्याने सुवर्णपदकांची कमाई त्याने केली. (अपवाद 2011 मधील 100 मीटर स्पर्धेचा) 2012 च्या लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदकं कमावली आहेत. शेवटच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून कारकीर्दीची राजेशाही सांगता व्हावी, अशी त्याची इच्छा आहे.


जाणून घ्या ‘उसेन बोल्ट’च्या या सात गोष्टी..
1) उसेन बोल्ट हा एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा. पण जिद्द आणि कठोर महेनतीच्या जोरावर त्याने धावण्याच्या शर्यतीत जगावर राज्य केले. 
2) लहानपणी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने दुकानात दारू आणि सिगारेट विकण्याचे काम केले. मात्र, आपला भविष्यकाळ उज्ज्वल असेल, याचे स्वप्न त्याने लहानपणापासूनच पाहिले. 
3) बोल्ट लहानपणी आपल्या भावाबरोबर क्रिकेट आणि फुटबॉल खेळायचा. बोल्टला क्रिकेट बॉलर बनायचे होते. शालेय स्पर्धेतच त्याने आपल्यातील वेगाची चुणूक दाखवली. 
4) बारा वर्षांचा असताना तो त्याच्या शाळेतील सर्वात वेगवान धावपटू बनला. त्यानंतर त्याच्या क्रिकेट कोचने त्याच्यातील क्षमता पाहून त्याला धावण्याच्या स्पर्धेत उतरण्याचा सल्ला दिला. 
5) आपले स्वप्न साकारण्यासाठी बोल्टने अखंड परिश्रम केले. मार्गात येणार्‍या सर्व अडचणींवर मात करत तो धावत राहिला. 
6) बोल्टला काही वेळा अपयशाचा सामनाही करावा लागला. मात्र, अपयशावर मात करून त्याने विश्वविक्रमांचा डोंगर रचला.
7) ‘पृथ्वीवरील सर्वात वेगवान माणूस’ असे बिरुद मिळवलेला बोल्ट आता अखेरची शर्यत धावणार आहे. या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून क्रीडारसिकांना अलविदा करण्याचा त्याचा संकल्प आहे. 
तुम्ही कुठून सुरवात करता, याला महत्त्व नाही. तर तुम्ही शेवट कसा करता हे महत्त्वाचे आहे.
                                                                                                                                                   - उसेन बोल्ट
उसेन बोल्ट चे विश्वविक्रम केलेले व्हिडीओ 

Usain Bolt 9.58sec 100m New World Record Berlin 



















Usain Bolt 19.19 new WORLD RECORD 200M Berlin 





"उसेन बोल्ट " नावाचं वादळ थांबणार !!! "उसेन बोल्ट " नावाचं वादळ थांबणार !!! Reviewed by Unknown on 12:51 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads