आंबेगाव पठारावरील इमारतीत झाला होता खून


प्रेयसीने केला प्रियकराच्या गुन्ह्याचा भांडाफोड



नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : आंबेगाव पठार येथील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये झालेला एका फिरस्त्याचा खून एका महिलेने उघड केला आहे. तो फिरस्ता तिच्याशी लगट करत असल्यामुळे तिचा प्रियकर सचिन नेवरे यानेच फिरस्त्याला संपवल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर हकीगत अशी की, स. नं. 25, आंबेगाव पठार येथील काळे नावाच्या व्यक्तीची बांधकाम अर्धवट झालेली इमारत आहे. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर एका व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात आला होता. ही घटना 21 जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्यातील मोठा दुवा असलेल्या महिलेने स्वतःच पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. आंबेगाव पठार येथे राहणार्‍या संबंधित महिलेला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे ती स्वतःच्या घरी न राहता प्रियकर सचिन महादेव नेवरे (वय 34, रा. खोपकर चाळ, मोहननगर, धनकवडी) याच्यासोबत आंबेगाव पठार येथील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर रहात होती. याच ठिकाणी फिरस्ता असलेला गजराज ऊर्फ रघू धरमवीरसिंग राजपूत (वय 40) हाही राहण्यासाठी आला होता. अर्धवट बांधकाम झालेले असल्यामुळे या इमारतीकडे कोणाचे लक्ष नव्हते. ती महिला, रघू आणि सचिन असे तिघेजण या अर्धवट इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर रहात होते. परंतु रघू हा महिलेशी नेहमी लगट करत होता. याचा सचिन याला राग होता. या कारणामुळे रघू आणि सचिन यांच्यात वादही झाला होता. घटनेच्या दिवशी रघू याचा आपल्या प्रेयसीच्या अंगावर हात असल्याचे पाहून सचिनच्या रागाचा पारा चढला. त्याने गजराज ऊर्फ रघू याचा शर्टच्या कापडाने गळा आवळून खून केला. याबाबतची माहिती त्या महिलेने तपास पथकाचे प्रमुख पीएसआय शिवदास गायकवाड यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन नेवरे याला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवदास गायकवाड, पोलिस कर्मचारी विनोद भंडलकर, प्रदीप गुरव, सतीश भालेकर, भीमराव पुरी, गणेश सुतार, समीर बागसीराज, बाबा नरळे यांचे पथक करत आहे.



आंबेगाव पठारावरील इमारतीत झाला होता खून आंबेगाव पठारावरील इमारतीत झाला होता खून Reviewed by Unknown on 8:14 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads