गुरुवारी पाणी येणार नाही बरं का



नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : देखभाल दुुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. 10) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (ता. 11) उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पर्वती, वडगांव, लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग येथील स्थापत्यविषयक आणि अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्वती जलकेंद्राच्या अंतर्गत येणारा पर्वती, पद्मावती, इंदिरानगर, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वतीदर्शन, सहकारनगर, सातारा रस्ता, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एरंडवणा, कोथरूड, लॉ कॉलेज रस्ता, मीठानगर, भाग्योदयनगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक, लष्कर, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
गुरुवारी पाणी येणार नाही बरं का गुरुवारी पाणी येणार नाही बरं का Reviewed by Unknown on 10:15 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads