‘रेरा’च्या नोंदणीसाठी ‘क्रेडाई’कडून मार्गदर्शन केंद्रे


‘रेरा’ च्या नोंदणीसाठी ‘क्रेडाई’ कडून मार्गदर्शन केंद्रे !!



नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : स्थावर संपदा कायद्याअंतर्गत (रेरा) प्रकल्पाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील प्रक्रियेसाठी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘क्रेडाई’च्यावतीने मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील 44 शहरांमध्ये 15 ऑगस्टपासून ही केंद्रे सुरू होणार असल्याची माहिती ‘क्रेडाई महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.

बांधकाम क्षेत्रातील अपप्रवृत्तींना आळा बसावा आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी केंद्र सरकारने ‘रेरा’ कायदा केला आहे. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार बिल्डरने त्याच्या प्रकल्पाची जाहिरात दिल्यानंतर प्रत्येक जाहिरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांकांची नोंद करणे, दर 3 महिन्यांनी प्रकल्पांविषयीचा प्रगती अहवाल वेबपेजवर टाकणे, कायदेशीर काळजी कशी घ्यावी आदी गोष्टींचे मार्गदर्शन या केंद्रावर करण्यात येणार आहे. ‘रेरा’ कायदा चांगला असून त्याचे स्वागतही आम्ही केले आहे.पण प्रत्येक विकसकाला ‘रेरा’तील नियमांची सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. यामुळेच भविष्यात होणार्‍या चुका कमी होण्यासाठी रेरा अभ्यास समितीमार्फत हे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे निश्चितच क्रेडाईच्या सर्व सदस्यांना या कायद्यांशी अधिक सुसंगतपणा साधता येईल आणि त्यांचे व्यवसाय सहजतेने चालवण्यासाठी मदत होईल. याशिवाय जास्तीत जास्त प्रकल्प रेरा अंतर्गत येऊ शकणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांनाच होणार असल्याचे कटारिया यांनी नमूद केले.

अधिक बातम्यांसाठी  Login  करा  http://namkarpune.com
‘रेरा’च्या नोंदणीसाठी ‘क्रेडाई’कडून मार्गदर्शन केंद्रे ‘रेरा’च्या नोंदणीसाठी ‘क्रेडाई’कडून मार्गदर्शन केंद्रे Reviewed by Unknown on 8:23 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads